पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरू
पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरू

पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी अनेक महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या पदवीच्या कला, विज्ञान, वाणिज्य आदी शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाचे प्रवेश पूर्वनोंदणीसाठीचे संकेतस्थळ सुरू ठेवण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच लागला असून या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ८३९ महाविद्यालयांतील पदवीची प्रवेश प्रक्रिया ८ ऑगस्टपूर्वी संपली होती. त्यानंतर त्यांचा अभ्यासक्रमही मागील महिन्यात सुरू झाला आहे. त्यात आता सरकारच्या धोरणाप्रमाणे बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जाऊ नये, यासाठी विविध महाविद्यालयांत रिक्त असलेल्या पदवी प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी विद्यापीठाने पदवीच्या प्रवेशपूर्व नोंदणीचे संकेतस्थळ पुन्हा एकदा सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.
...
नोंदणी बंधनकारक
बारावीच्या फेरपरीक्षेत मुंबई विभागातून बसलेल्या २४ हजार ९८९ विद्यार्थ्यांपैकी ७ जात ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार विविध महाविद्यालयांत प्रवेश मिळणार आहे, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08556 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..