मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीजसाठी पुन्हा एकदा प्रवेशपूर्व परीक्षेची संधी; ८ सप्टेंबर रोजी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीजसाठी पुन्हा एकदा प्रवेशपूर्व परीक्षेची संधी; ८ सप्टेंबर रोजी परीक्षा
मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीजसाठी पुन्हा एकदा प्रवेशपूर्व परीक्षेची संधी; ८ सप्टेंबर रोजी परीक्षा

मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीजसाठी पुन्हा एकदा प्रवेशपूर्व परीक्षेची संधी; ८ सप्टेंबर रोजी परीक्षा

sakal_logo
By

‘आर्ट इन हिंदू स्टडीज’साठी
पुन्हा प्रवेशपूर्व परीक्षेची संधी
पहिल्याच टप्प्यात ६० पैकी ४५ जागांवर प्रवेश
मुंबई, ता. ५ : मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या हिंदू अभ्यास केंद्राच्या ‘मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज’ या दोन वर्षीय पदव्युत्तर पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात ६० पैकी ४५ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित जागांसाठी ८ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

‘मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज’ अभ्यासक्रमाकरिता २०२२-२३ साठी एकूण ६० जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही विद्या शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी उपलब्ध जागांसाठी हिंदू अभ्यास केंद्रामार्फत प्रवेशपूर्व परीक्षा २० ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. त्यात एकूण ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नुकतीच त्यांची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन रिक्त जागांवर पुन्हा प्रवेश केले जाणार आहेत. त्यासाठी ८ सप्टेंबर रोजी दुसरी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना https://uom-admissions.mu.ac.in/ या संकेतस्थळावर ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करून परीक्षेला बसता येईल, अशी माहिती संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे यांनी दिली. सध्या या केंद्राचा भारतीय शिक्षण पद्धतीवर शिक्षक विकास हा सहा दिवसाचा कार्यक्रम सुरू आहे. हिंदू तत्त्वज्ञान केंद्राचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08558 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..