रूफटॉप सोलरकडे सोसायट्यांचा कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूफटॉप सोलरकडे सोसायट्यांचा कल
रूफटॉप सोलरकडे सोसायट्यांचा कल

रूफटॉप सोलरकडे सोसायट्यांचा कल

sakal_logo
By

रूफटॉप सोलरकडे सोसायट्यांचा कल
नामांकित संस्थांकडूनही मागणी; वीजबिलात बचत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : बदलती जीवनशैली आणि हवामानामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यातच विजेचे दरही वाढत असून त्याचा नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी वीजबचतीसाठी गृहनिर्माण सोसायटी आणि नामांकित संस्था रूफटॉप सोलरकडे वळू लागल्या आहेत. गेल्या सात वर्षांत एमएमआर क्षेत्रात शेकडो संस्थांनी रूफटॉप सोलर बसवले असून त्यांच्या वीजबिलातही मोठी बचत होऊ लागली आहे.
केंद्र सरकार सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रूफटॉप बसवण्यासाठी सबसीडी देत आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात वीज वितरण कंपन्या करत आहेत. त्यानुसार रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. शहरामध्ये जागेची कमतरता आणि पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने रूफटॉप सोलर लावण्यात अडचणी येत आहेत. मात्र, पुरेसा सूर्यप्रकाश असलेल्या सोसायट्या आता रूफटॉप सोलरकडे वळू लागल्या आहेत.

टाटा पॉवर कंपनीने सात वर्षांत मुंबई महानगर क्षेत्रात २८५ सोसायटी आणि तीसहून अधिक संस्थांनी रूफटॉप बसवले आहेत. वरळी आणि फोर्टमधील इमारतींनीही रूफटॉप सोलर बसवले असून बहुतांश संस्थांची २५ ते ८३ टक्क्यांपर्यंत वीज बचत झाली आहे. रूफटॉप सोलर लावण्यासाठी सोसायट्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी विविध बँका आणि एनबीएफसीसोबत करार केला असल्याचे टाटा पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08563 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..