सांताक्रूझच्या गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांताक्रूझच्या गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम
सांताक्रूझच्या गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम

सांताक्रूझच्या गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ५ : सांताक्रूझ येथील शिवशक्ती सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी एक वेगळा उपक्रम राबवला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना ‘एक वही व एक पेन’ आणण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले आहे. या उपक्रमाला आतापर्यंत जवळपास १०० जणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व गणेशभक्तांनी एकावेळेस दोन ते तीन वह्या आणि पेन मंडळाकडे सुपूर्द केले आहेत.
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०१६ पासून गणेशोत्सव काळात ‘एक वही व एक पेन’ हा सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई यांना विभागातील गणेशभक्तांच्या वतीने आदरांजली वाहण्यात येणार आहे. समाजातील दुबळ्या घटकातील विद्यार्थ्यांना ही वही व पेन वाटून आदरांजली वहावी, या हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत या मंडळाने पूरग्रस्त भाग, कुष्ठरुग्ण वसाहत व आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08567 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..