सेन्सेक्स ४४२ अंश वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स ४४२ अंश वाढला
सेन्सेक्स ४४२ अंश वाढला

सेन्सेक्स ४४२ अंश वाढला

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : जागतिक बाजार सोमवारी कमकुवत असले तरीही भारतीय शेअरबाजारांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स ४४२.६५ अंश, तर निफ्टी १२६.३५ अंश वाढला.

चीनमधील मंदीची छाया, अमेरिकेतील रोजगारांचा तपशील बरा आल्याने व्याजदरवाढ करण्यास फेडला मिळणारी ताकद, रशियाने युरोपला जाणारी एक वायूवाहिनी बंद केल्यामुळे तेथे पसरलेले इंधन दरवाढीच्या भीतीचे वातावरण, या सर्वांकडे आज भारतीय शेअरबाजारांनी दुर्लक्ष केले. भारतीय अर्थव्यवस्थेचा तपशील आशादायक असल्याने परदेशी गुंतवणूकदारांनीही आज खरेदी केल्याने दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,२४५.९८ अंशांवर, तर निफ्टी १७,६६५.८० अंशांवर स्थिरावला.

आज बीएसईवर सुमारे ४०० शेअरना अप्पर सर्किट लागले, तर अंदाजे २०० शेअर लोअर सर्किटमध्ये बंद झाले. बीएसईवरच २,२०० शेअर नफ्यात होते व १,३५० शेअर तोटा दाखवत बंद झाले. आज बँका, वाहननिर्मिती आणि धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर तेजीत होते; तर निफ्टीच्या मुख्य शेअरपैकी ३५, तर सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी २४ शेअर नफा दाखवत होते.

आज बीएसईवर नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो या शेअरचे भाव अर्धा ते दीड टक्का घसरले; तर हिंदुस्थान युनिलीव्हर, एशियन पेंट, पॉवरग्रीड यांचे भाव किरकोळ घसरले. सनफार्मा, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टेक महिंद्र, एअरटेल या शेअरचे भाव एक ते दोन टक्के वाढले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08579 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..