नवाब मलिक यांनी दोनदा जबाब बदलला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik
नवाब मलिक यांनी दोन वेळा जबाब बदलला!

नवाब मलिक यांनी दोनदा जबाब बदलला!

मुंबई : मनी लॉण्डरिंगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी चौकशीदरम्यान दोन वेळा आपला जबाब बदलला आहे, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन ‘ईडी’ने त्याची चौकशी केली़. त्यात दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि त्यांनी एका व्यवहारात सहभाग घेतल्याचे उघड झाल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. ‘

ईडी’ने फेब्रुवारी महिन्यात मलिक यांना अटक केली होती; मात्र पाच महिने उलटूनही सबळ पुरावे दाखल केले नाही, असा आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे जामीन मंजूर करण्याची मागणी केली आहे.‘ईडी’ने या अर्जाला विरोध केला आहे. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी निश्चित केली.


शहानिशा न करता व्यवहार
नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोन वेळा आपला जबाब बदलला आहे, अशी माहिती ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दिली. तसेच गोवावाला कंपाऊंड ही जमीन कोणतीही शहानिशा न करता मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांच्याकडून खरेदी केल्याचा दावाही ‘ईडी’कडून करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08595 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..