बेस्टमधील कंत्राटी कामगारांना न्याय द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टमधील कंत्राटी कामगारांना न्याय द्या!
बेस्टमधील कंत्राटी कामगारांना न्याय द्या!

बेस्टमधील कंत्राटी कामगारांना न्याय द्या!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : बेस्ट परिवहन उपक्रमामध्ये काही दिवसांपूर्वीच मे. एम. पी. ग्रुप अंतर्गत काम करणाऱ्या एका कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. असे असूनही बेस्ट प्रशासन कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून केला जात असून, कामगारांच्या विविध समस्यांवर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी याप्रश्नावर कंत्राटदार कंपन्यांवर विविध आरोप केले आहेत. कामगारांना कामावर ठेवताना २० ते ३० हजार रुपये डिपॉझिट म्हणून जमा करणे केले, कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करणे आदी आरोपांचा समावेश आहे. कंत्राटदारांच्या सांगण्यानुसार बेस्टने दररोज किमान किलोमीटर बस चालेल, असे ठरवून दिले आहे. परंतु बेस्टने ते किलोमीटर कमी केल्याने देय रक्कम कमी होत असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर होत आहे. यावर बेस्ट प्रशासनाने तोडगा काढावा, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08599 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..