शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा आमने-सामने आले आहेत. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटात जुंपली असून आता शिंदे गटाने शिवाजी पार्कला पर्याय निवडला आहे. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एमएमआरडीएचे मैदान मिळविण्यासाठी शिंदे यांनी अर्ज केल्याची चर्चा आहे; मात्र एमएमआरडीएकडे याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी यावर बोलणे टाळले.

शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेमार्फत दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याला ५०हून अधिक वर्षांची परंपरा असून बाळासाहेब ठाकरे यांनी सभांमधून अनेकांवर तोफ डागली आहे. हीच परंपरा शिवसेना चालवत असताना पक्षामध्ये बंडाळी होऊन दोन गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा केला आहे. तसेच दसरा मेळावा घेण्याची तयारी या गटाने केली असून शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी अर्ज केला आहे; मात्र शिवसेनेने पालिकेकडे प्रथम अर्ज केल्याने हे मैदान हातून निसटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिंदे यांनी बीकेसीत दसरा मेळावा घेण्यासाठी एमएमआरडीएकडे अर्ज केल्याची चर्चा आहे. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08601 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..