मुंबईत तिसरी संविधान परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत तिसरी संविधान परिषद
मुंबईत तिसरी संविधान परिषद

मुंबईत तिसरी संविधान परिषद

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे देशभरात १० संविधान परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर तिसरी संविधान परिषद मुंबईत २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत परळ येथील डॉ. शिरोडकर सभागृहात होणार आहे. बीआरएसपीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विविध राजकीय पक्षाचे नेते, तज्ज्ञ आपली मते मांडणार आहेत. बीआरएसपीतर्फे पहिल्या टप्प्यातील पाच संविधान परिषदा राज्यात डिसेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत. उर्वरित पाच परिषदा या दुसऱ्या टप्प्यामध्ये जानेवारी २०२३ ते मे २०२३ पर्यंत दिल्ली, चंडीगड, लखनौ, अहमदाबाद व केरळमधील कोची या ठिकाणी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सतीश बनसोडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08609 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..