मलिकांना किडनी तपासणीसाठी परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिकांना किडनी तपासणीसाठी परवानगी
मलिकांना किडनी तपासणीसाठी परवानगी

मलिकांना किडनी तपासणीसाठी परवानगी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले आमदार नवाब मलिक यांना किडनीसंबंधित रेनल स्कॅनिंग तपासणी करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. कुर्ल्यामधील जमीनखरेदी व्यवहारात कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मलिक यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मलिक यांना यापूर्वी एका विशिष्ट पद्धतीने किडनी तपासणीची मुभा दिली होती; मात्र त्यांना ताप आणि अन्य आजार झाल्यामुळे ही तपासणी केली नाही. आता ते वैद्यकीय दृष्टीने स्थिर आहेत. त्यामुळे चाचणी करू शकतो, असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयाने रेनल स्कॅन तपासणी करण्याची मुभा त्यांना दिली आहे. ही चाचणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ निर्णय देतील, असे या निर्देशांमध्ये स्पष्ट केले. घाटकोपर येथील सर्वोदय रुग्णालयात १२ सप्टेंबरला ही तपासणी होणार आहे. दरम्यान, मलिक यांनी जामिनासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08621 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..