नांदगांव संलग्न परिसर मंडळाची शतकाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगांव संलग्न परिसर मंडळाची शतकाकडे वाटचाल
नांदगांव संलग्न परिसर मंडळाची शतकाकडे वाटचाल

नांदगांव संलग्न परिसर मंडळाची शतकाकडे वाटचाल

sakal_logo
By

भाग्‍यश्री भुवड
नांदगाव संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३० साली झाली. यंदा या मंडळाचे ९३ वे वर्ष असून हे मंडळ सध्‍या शतकीय वर्षाकडे वाटचाल करत आहे. मुंबईतील सर्वात जुन्या आणि पहिल्या पाच बाप्पांमध्ये या बाप्पाचा क्रमांक लागतो. 
गेल्या अनेक वर्षांपासून समाजात सक्रिय सहभाग घेतलेल्या मंडळाने यंदा ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा बाप्पा ‘महागणपती श्री नायगावेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे. या मंडळाचे खास आकर्षण म्हणजे १९८३ पासून म्हणजेच मागील ३५ वर्षांपासून हे हरिनाम, कीर्तन सप्ताह राबवत आहेत. लहान-थोरांपासून ज्येष्ठ महिला व पुरुष हरिनाम सप्ताहात उत्साहाने सहभागी होतात. आतापर्यंत यामध्‍ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांनी हजेरी लावल्‍याची माहिती मंडळाचे सदस्य सुरेश शिंदे यांनी दिली.
आरोग्य शिबिरांचे आयोजन, लहान मुलांसाठी शिष्यवृत्ती, हरिनाम सप्ताह, कीर्तनाचे आयोजन अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव जल्लोष पार पडला. अनेक उपक्रम राबवत मंडळाची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्‍याचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश खेडेकर यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष संदीप नार्वेकर आणि सरचिटणीस मयुरेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव मंडळाचे कार्य सुरू असून यापुढे अधिक जोमाने सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्‍याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08631 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..