...तर बलात्कारातील आरोपीलाही जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर बलात्कारातील आरोपीलाही जामीन
...तर बलात्कारातील आरोपीलाही जामीन

...तर बलात्कारातील आरोपीलाही जामीन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन आरोपीच्या वर्तणुकीचा अहवाल चांगला असेल तर त्याला जामीन मंजूर होऊ शकतो, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदविले आहे. आरोपीवर सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याला पोलिसांनी अटक केली होती. दोन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता, ज्यावेळी आरोपी अल्पवयीन होता. आरोपी आता सज्ञान असून त्याने जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

ज्युवेनाईल न्याय मंडळाने आरोपीच्या वागणुकीबाबत न्यायालयात अहवाल सादर केला होता. जामीन मंजूर करण्यासाठी न्यायालयाने कारागृह तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाची दखल घेतली. या अहवालानुसार आरोपी जर जामिनावर सुटला तर तो समाजाला धोका ठरू शकत नाही आणि त्याची वर्तणूक चांगली आहे. तसेच आरोपी आता सज्ञान असून त्याची शिक्षणाची संधी डावलता कामा नये, असेही खंडपीठाने म्हटले आहे. जामीन अर्ज दाखल करताना आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याने त्याच्या आईमार्फत अर्ज केला होता. आरोपीसह पाच प्रौढ आरोपींवर सामूहिक बलात्काराचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. आरोपी मुलगा शाळेत शिकत होता; मात्र अटकेमुळे त्याचे शिक्षण खोळंबले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08638 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..