‘मालेगाव’ प्रकरणात आणखी एक फितूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मालेगाव’ प्रकरणात आणखी एक फितूर
‘मालेगाव’ प्रकरणात आणखी एक फितूर

‘मालेगाव’ प्रकरणात आणखी एक फितूर

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आज आणखी एक साक्षीदार फितूर घोषित करण्यात आला. यामुळे आता एकूण २६ साक्षीदारांनी आपली जबानी फिरवली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे. आज अभियोग पक्षाने एका पंच साक्षीदाराला साक्ष नोंदविण्यासाठी बोलविले होते. प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहित याच्याशी संबंधित हा साक्षीदार होता; मात्र न्यायालयात त्याने आपली जबानी फिरवली. त्यामुळे एनआयएने त्याला फितूर घोषित केले आहे. यापूर्वी देखील एटीएसने नोंदविलेले जबाब साक्षीदारांनी फिरविल्याची प्रकरणे घडली आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जबानी फिरविणाऱ्या साक्षीदारांमध्ये एटीएस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या जबाबाचा संबंध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08642 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..