Patra Chawl Land Scam Case : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा; विशेष न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patra Chawl Land Scam Case sanjay raut ed court mumbai
राऊतांच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा

Patra Chawl Land Scam Case : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा; विशेष न्यायालय

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने आज दिले. मागील एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत असून, ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

राऊत यांच्या वतीने ॲड. विक्रांत साबणे यांनी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली; मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यबाहुल्यांमुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला निश्चित केली आहे. राऊत सध्या १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08647 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..