दहिसर नदीत विसर्जन नको! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसर नदीत विसर्जन नको!
दहिसर नदीत विसर्जन नको!

दहिसर नदीत विसर्जन नको!

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : अनंत चतुर्दशीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहिसर नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांना दिले. गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणाप्रति संवेदनशील असायला हवे, असा सूचक सल्लाही न्यायालयाने दिला.
‘मुंबई मार्च’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ॲड. सुदीप नारगोळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. दहिसर नदीत गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याचे याचिकेत म्हटले. न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी झाली. पर्यावरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने याचिकेची दखल घेत दहिसर नदीत विसर्जन करण्यास मनाई केली. गणेशमूर्तींचे विसर्जन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कृत्रिम तलावात करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.
मुंबई महापालिकेने गतवर्षी दहिसर नदी सुशोभीकरण करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी सुमारे २४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने नदीच्या प्रदूषणाबाबत प्रशासनाला, प्रदूषण मंडळाला आणि वनविभागाला निवेदन दिले होते; मात्र तरीही येथील नदीत विसर्जनाबाबत तयारी करण्यात येत होती. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत संस्थेच्या वतीने गुरुवारी शांततापूर्ण आंदोलनदेखील केले होते. राज्य सरकारने याबाबत कोणालाही परवानगी दिली नव्हती, असा दावा सुनावणीदरम्यान करण्यात आला; मात्र याबाबत आलेल्या वृत्तामध्ये परवानगी दिल्याचे याचिकादारांकडून सांगण्यात आले.
---
कारवाईचे आदेश
उद्यानात दुर्मिळ वनस्पती आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. उद्यानात शुक्रवारी जादा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. विनापरवानगी विसर्जन करण्यासाठी उद्यानात येणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही आदेश न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08648 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..