वळणांपेक्षा सरळ रस्तेच सर्वाधिक धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळणांपेक्षा सरळ रस्तेच सर्वाधिक धोकादायक
वळणांपेक्षा सरळ रस्तेच सर्वाधिक धोकादायक

वळणांपेक्षा सरळ रस्तेच सर्वाधिक धोकादायक

sakal_logo
By

वळणांपेक्षा सरळ रस्तेच सर्वाधिक धोकादायक
स्थानिक रस्त्यानंतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांची संख्या जास्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : वाहनचालकांच्या चुकांसह वाहतूक नियम मोडल्यास होत असलेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात वळणदार रस्त्यांवर न होता सरळ रस्त्यांवर होत असल्याची धक्कादायक माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. २०२० मध्ये एकूण २४९७१ अपघातांपैकी २०८९८ अपघात सरळ रस्त्यांवर झाले. त्या तुलनेत गेल्या वर्षी २०२१ मध्ये अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून, यामध्ये एकूण २९४७७ अपघात झाले असून, त्यापैकी २५१४६ अपघात हे सरळ रस्त्यांवरच झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यभरात यापूर्वी वळणदार एकेरी डांबरी रस्त्यांवरून वाट काढताना वाहन चालकांना पूर्णवेळ अलर्ट राहून वाहन चालवावे लागत होते. जसजसा रस्त्यांच्या विकासात बदल होत गेला, त्याप्रमाणे डांबरी रस्ते सिमेंट-काँक्रीटचे उभारण्यात आले. शिवाय शहराचे अंतर कमी करण्यासाठी सरळमार्गसुद्धा काढण्यात आले. रस्त्यांमध्ये येणाऱ्या डोंगर-दऱ्यांमधून वाट काढत बोगदे, नद्या, नाल्यांवरून ब्रीज बांधण्यात आले. त्यामुळे आता एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत पोहचण्याचे अंतर घटले. शिवाय त्याच प्रमाणात वाहनांचा वेग वाढला. त्यातच सरळ रस्त्यांवरील वेग मर्यादासुद्धा वाढवण्यात आली असून तीन पदरी, चार पदरी रस्त्यांमुळे वाहतूकदार आता बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे.

परिणामी सरळ रस्त्यांवर वाहनांचे अपघात आणि मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी २०२१ मध्ये सरळ रस्त्यांवर २५१४६ एकूण अपघातांमध्ये ११३३३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याप्रमाणेच १३३९२ नागरिक जखमी झाले असून, ५९५८ नागरिकांना गंभीर दुखापती होऊन अपंगत्व आले आहे; तर वक्र रस्त्यांवरही २८९४ अपघात झाले असून, १४७८ नागरिकांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
---------------
सरळ रस्त्यांवर अपघात रोखण्याचे आव्हान
मुंबई-पुणे महामार्ग काही प्रमाणात सरळ असून, बऱ्याच ठिकाणी वक्र रस्तासुद्धा आहे. शिवाय पुणे-मुंबई रस्त्यावर उतरता भाग असल्याने सर्वाधिक अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय आता नव्याने नागपूर-मुंबई जोडणारा समृद्धी महामार्गसुद्धा सरळ असल्याने भविष्यात या महामार्गावर अपघात आणि अपघातांमध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी आताच ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
----------------
गेल्या वर्षभरातील अपघात
रस्त्यांचे प्रकार - एकूण अपघात - एकूण मृत्यू
सरळ रस्ते - २५१४६ - ११३३३
वक्र रस्ते - २८९४ - १४७८
ब्रीज रस्ते - ७८५ - ३७९
नाल्यावरील रस्ते - १६८ - १०७
खड्डेयुक्त रस्ते - ३३ - १४
चढते- उतरते रस्ते - १९८ - ६८
रस्त्यांचे काम सुरू असताना - २५३ - १४९
एकूण - २९४७७ - १३५२८
--------------
बॉक्स
रस्त्यांचे प्रकार - अपघात - मृत्यू
द्रुतगती महामार्ग - २०० - ८८
राष्ट्रीय महामार्ग - ७३०१ - ३९९२
राज्य महामार्ग - ६३२८ - ३४११
इतर रस्ते - १५६४८ - ६०३७
एकूण - २९४७७ - १३५२८

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08658 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..