गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘आवाज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘आवाज’
गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘आवाज’

गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘आवाज’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची घोषणाच राज्य सरकारने केल्याने गणपती मंडळांनीही कोणतीही कसर न ठेवता जल्लोष केला. गणपती आगमन सोहळ्याप्रमाणेच विसर्जन मिरवणुकाही मोठ्या जल्लोषात निघाल्या; परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत ‘बँजो’चा आवाज वाढल्याने ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरात सर्वाधिक १२०.२ डेसिबल आवाजाची नोंद झाल्याची माहिती ‘आवाज फाऊंडेशन’च्या प्रमुख सुमायरा अब्दूलाली यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

लाडक्या गणरायाला १० व्या दिवशी निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिरवणुकांचे आयोजन गणपती मंडळांनी केले होते. ढोल, ताशे आणि बँजो यांसारख्या वाद्यवृंदाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यातच राज्य सरकाने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने मिरवणुकांमध्ये अधिक भपकेबाजीवर भर देण्यात आला होता. यादरम्यान मध्यरात्रीनंतर निघालेल्या मिरवणुकांमध्ये ऑपेरा हाऊसमध्ये सर्वाधिक १२०.२ डीबी आवाज पातळी नोंदवण्यात आल्याची माहिती अब्दूलाली यांनी दिली. याबाबत मुंबई पोलिसांना ट्विटरवर तक्रार केल्यानंतर आवाज कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

गिरगाव चौपाटी विसर्जन मार्गावर यंदा रात्रभर कर्णकर्कश आवाजात मिरवणुका सुरू होत्या. शुक्रवारी रात्री १.२५ च्या सुमारास गिरगाव चौपाटी येथील पोलिस नियंत्रण कक्षाला वैयक्तिक भेट देऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडे त्याच वेळी ट्विटरवर तक्रारही केली; मात्र त्यानंतरही पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने मोठ्या आवाजात वाद्यवृंदासह मिरवणुका सुरूच राहिल्या.
- सुमायरा अब्दूलाली, प्रमुख, आवाज फाऊंडेशन

वाद्यांचा मोठ्या प्रमाणात वापर
१) बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर ड्रम, बेंजो, लाऊड स्पीकर, मेटल सिलिंडरचा वापर करण्यात आला. काही मिरवणुकांमध्ये बंदी असलेले डीजेही बिनधास्त वाजवण्यात आले. त्यामुळे ऑपेरा हाऊसपाठोपाठ शास्त्रीनगर ११८, गिरगाव, १०६.९, वरळी येथे १०५ डीबी आवाजाची नोंद झाली.
२) गेल्या वर्षी २०२१ मध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वोच्च डेसिबल पातळी ९३.१ डीबी होती; तर त्याआधी म्हणजे २०२० मध्ये १००.७ डीबी आणि २०१९ मध्ये १२१.३ डीबी आवाजाची नोंद झाली होती.
...........
ठिकाण आवाज पातळी (डेसिबल)
ऑपेरा हाऊस : १२०
शास्त्री नगर : ११८
गिरगाव : १०६.९
वरळी : १०५
लिंकिंग रोड : १०१
जुही तारारोड : १०१
माटुंगा : १०३
शिवाजी पार्क : ९९
पेडर रोड : ९८
कफ परेड : ९८
.........

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08665 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..