आपला समुद्र किनारा,आपली जबाबदारी : विसर्जनानंतर मनसेची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपला समुद्र किनारा,आपली जबाबदारी : विसर्जनानंतर मनसेची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम
आपला समुद्र किनारा,आपली जबाबदारी : विसर्जनानंतर मनसेची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

आपला समुद्र किनारा,आपली जबाबदारी : विसर्जनानंतर मनसेची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

मनसेतर्फेही किनाऱ्याची साफसफाई
मनसे आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी यंदाही मुंबईसह उपनगरांतील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहिमेत सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटनांनी मोहिमेमध्ये सहभाग घेतला. स्वतः अमित ठाकरे मोहिमेत उतरले होते. मनसेच्या मोहिमेमध्ये शेकडो महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पहाटे मुंबईतील गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर स्वछता मोहीम राबवली. रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग आणि मुरुडबरोबरच रत्नागिरीतही मनसेने सकाळी ८ ते १० दरम्यान स्वच्छता करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08673 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..