नेहरू सेंटरच्या महोत्सवात तीन भाषिक नाटकांचा आविष्कार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरू सेंटरच्या महोत्सवात तीन भाषिक नाटकांचा आविष्कार!
नेहरू सेंटरच्या महोत्सवात तीन भाषिक नाटकांचा आविष्कार!

नेहरू सेंटरच्या महोत्सवात तीन भाषिक नाटकांचा आविष्कार!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ ः नाट्यप्रेमींनी प्रतीक्षा करावी असे दोन-चार महोत्सव होत असतात. त्यात कला, संस्कृती आणि विज्ञान यांचे संवर्धन करणाऱ्या नेहरू सेंटरच्या ‘राष्ट्रीय नाट्यमहोत्सवा’चा आवर्जून उल्लेख केला जातो. सध्याचा महोत्सव रौप्यमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत असून तीन भाषिक नाटकांचा आविष्कार त्यात पाहायला मिळणार आहे. महोत्सवाचे यंदाचे २४ वे वर्ष असून १९ ते २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान वरळीतील नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात तो रंगणार आहे.

कोविड संसर्गामुळे महोत्सव होऊ शकला नव्हता. आता पुन्हा त्याला सुरुवात होत आहे. राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या मराठी, हिंदी व गुजरातीतील एकूण पाच नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. दररोज ७ वाजता प्रेक्षकांना त्याचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे. महोत्सवात ‘साम्राज्यम्’ आणि ‘हसता हा सवता’ अशा दोन मराठी नाटकांसोबत ‘आधेअधुरे’ अन् ‘दृष्टी-दान’ अशा दोन हिंदी कलाकृतींचा समावेश आहे. ‘पप्पा मारा पुष्पराज’ हे गुजराती नाटकही सादर केले जाणार आहे. महोत्सवात सादर होणारी नाटके व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगमंचावर यशस्वी ठरलेली आहेत. त्याचा एकत्रित आविष्कार महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला असून त्याच्या प्रवेशासाठी १४ सप्टेंबरपासून सकाळी १०.३० वाजता नेहरू सेंटरच्या सभागृहात तिकीट काऊंटरवरून प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृति‍क विभागाचे सहसंचालक चंद्रकात राणे यांनी दिली.

प्रवेश मोफत
पहिल्या दिवशी जगदीश पवार लिखित ‘साम्राज्यम्’ मराठी नाटक सादर केले जाईल. २० सप्टेंबर रोजी हिंदी नाटक ‘आधेअधुरे’, २१ सप्टेंबर रोजी गुजराती नाटक ‘पप्पा मारा पुष्पराज’, २२ सप्टेंबर रोजी ‘दृष्टी-दान’ आणि अखेरच्या दिवशी अभिनंदन भडकमकर यांनी लिहिलेले मराठी नाटक ‘हसता हा सवता’ सादर केले जाणार असून त्यासाठी प्रवेश मोफत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08680 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..