Mumbai : म्युचुअल फंडाची मालमत्ता ३९ लाखकोटी रुपयांपुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mutual funds
म्युचुअल फंडाची मालमत्ता ३९ लाखकोटी रुपयांपुढे

Mumbai : म्युचुअल फंडाची मालमत्ता ३९ लाखकोटी रुपयांपुढे

मुंबई : भारतीय म्युचुअल फंड उद्योगांची ऑगस्टमधील एकूण संपत्ती आता सर्वकालिक उच्चांकावर म्हणजे ३९.३३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यामध्ये सात टक्के वाढ झाली. किरकोळ गुंतवणूकदारांची खाती आता १० कोटी ८९ लाख एवढी झाली आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपेक्षा २२ टक्के वाढ झाली. एकूण खाती १३ कोटी ६४ लाख असून त्यातील वार्षिक वाढ २६ टक्के आहे. ऑगस्ट महिन्यात त्यातील एसआयपींची संख्या (नियमित रकमेचा भरणा) पाच कोटी ७१ लाख एवढी होती; तर दरमहा एसआयपी करणाऱ्यांमार्फत १२ हजार ६९३ कोटी रुपयांचा भरणा होतो. सर्व एसआयपी योजनांचे एकत्रित मूल्य ६.३९ लाख कोटी रुपये झाले, असे असोसिएशन ऑफ म्युचुअल फंड इंडस्ट्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. व्यंकटेश यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात ओपन एंडेड प्रकारच्या सर्व फंडांमध्ये ६३ हजार ८४३ कोटी रुपयांचा भरणा झाला. त्यात इक्विटी ग्रोथ गटात फ्लेक्सीकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्ज अँड एएमपी, मिडकॅप व फोकस्ड स्कीम यांच्यात सर्वात जास्त गुंतवणूक झाली. रिटायरमेंट स्कीम, चिल्ड्रेन सेव्हिंग फंड, इंडेक्स फंड व इटीएफ यांच्यातील गुंतवणुकीतही या महिन्यात वाढ झाली, अशीही माहिती व्यंकटेश यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08683 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..