गणेशोत्सवात ५ लाख किलो निर्माल्य जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात ५ लाख किलो निर्माल्य जमा
गणेशोत्सवात ५ लाख किलो निर्माल्य जमा

गणेशोत्सवात ५ लाख किलो निर्माल्य जमा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : अनंत चतुर्थीला गणरायाचरणी वाहिलेल्या पाने, फुले, दूर्वांमधून तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले. सर्वाधिक निर्माल्य संकलन हे अनुक्रमे भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांमध्ये झाले आहे. पालिका या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून उद्यानांना पुरवणार असल्याची माहिती उपयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली.
गणपती बाप्पाला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अर्पण करण्यात आलेले सुमारे ५ लाख ४९ हजार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच आता या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे. पुढील साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तयार होणारे हे सेंद्रिय खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे.
...
४१९ कलश, ३८१ वाहने
निर्माल्य गोळा करण्यासाठी ४१९ कलश पुरवण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करून खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ३८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यानुसार सर्व २४ विभागांमधून निर्माल्य गोळा करण्यात आले.
...
सहा हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ
गणेशोत्सव कालावधीत विसर्जनस्थळी व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अशासकीय संस्थांकडून कामगारांची व्यवस्था करण्यात आली होती. या साफसफाई संबंधित कामांकरिता साधारणपणे ६ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ अव्याहतपणे कार्यरत होते. तसेच विसर्जनस्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी अतिरिक्त वाहनांच्या सेवाही पुरविण्यात आल्या होत्या.
...
विभागवार निर्माल्य जमा
१. ए विभाग - १,०१० किलो
२. बी विभाग - २५३ किलो
३. सी विभाग - ९०० किलो
४. डी विभाग - २२,२९६ किलो
५. ई विभाग - १,३५५ किलो
६. एफ दक्षिण विभाग - १२,७५० किलो
७. एफ उत्तर विभाग - ६,५५० किलो
८. जी दक्षिण विभाग - १३,३५५ किलो
९. जी उत्तर विभाग - ३७,१५५ किलो
१०. एच पूर्व विभाग - ४६,२८० किलो
११. एच पश्चिम विभाग- ११,८०० किलो
१२. के पूर्व विभाग - २९,७९० किलो
१३. के पश्चिम विभाग - ५९,५०० किलो
१४. पी दक्षिण विभाग - २७,४८५ किलो
१५. पी उत्तर विभाग - १७,५७९ किलो
१६. एल विभाग - ४५,४५० किलो
१७. एम पूर्व विभाग - ३६,९३३ किलो
१८. एम पश्चिम विभाग - ८,०५० किलो
१९. एन विभाग - ४,६८५ किलो
२०. एस विभाग - ७७,८२५ किलो
२१. टी विभाग - १३,६५५ किलो
२२. आर दक्षिण विभाग - ८,०७० किलो
२३. आर मध्य विभाग - ५५,७०० किलो
२४. आर उत्तर विभाग - ११,०८९ किलो

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08703 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..