मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस
मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस

मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : गेल्या तीन महिन्यांत मुंबईत २,४७२ मिमी पाऊस झाला. मुंबईत सरासरी ९१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्के कमी पाऊस झाला. पावसाचा साधारण एक महिना बाकी असून त्यात बॅकलॉग भरून निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या महितीनुसार मुंबईत आतापार्यंत एकूण सरासरी २,४७२ किमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांत सरासरी २,५०२ मिमी पाऊस झाला होता. त्या वेळी पावसाचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर होते.
यंदा १२ सप्टेंबरपर्यंत कुलाबा १,८६२.५० मिमी आणि सांताक्रूझ २,४०१.२० मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी २०२१ मध्ये १२ सप्टेंबरपर्यंत कुलाब्यात २,१७५.१; तर सांताक्रूझमध्ये २८२९.२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरी ७ टक्के कमी पाऊस झाला.
यंदा पूर्व उपनगरामध्ये अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात सर्वाधिक २,४५८.५७ मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल पश्चिम उपनगर २,२३९.६४ मिमी आणि शहरात २,१०३.९४ मिमी पावसाची नोंद झाली. शहरामध्ये ९३.९३; तर दोन्ही उपनगरांमध्ये प्रत्येकी ८६.८४ मिमी पाऊस झाला.
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारण ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

२०२१ २०२२
कुलाबा ः २१७५.०१ (९४.७८ टक्के) १८६२.५० (८३.१५ टक्के)
सांताक्रूझ ः २८२९.२ (१०४.६३ टक्के) २४०१.२० (८८.७७ टक्के)

वार्षिक सरासरी पाऊस यंदा झालेला पाऊस
कुलाबा ः २२४० मिमी १८६२.५० मिमी
सांताक्रूझ ः २७०५ मिमी २४०१.२० मिमी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08719 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..