बाल न्याय विभागाच्या दिशाभूलप्रकरणी चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल न्याय विभागाच्या दिशाभूलप्रकरणी चौकशी
बाल न्याय विभागाच्या दिशाभूलप्रकरणी चौकशी

बाल न्याय विभागाच्या दिशाभूलप्रकरणी चौकशी

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : हत्येच्या एका प्रकरणात अल्पवयीन असलेल्या आरोपीला सज्ञान दाखवून पोलिस निरीक्षकांनी बाल न्याय विभागाची धादांत दिशाभूल केल्याच्या आरोपांबाबात चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. सतरा वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठाणे कारागृहात ठेवले आहे. याबाबत उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिंडोशी पोलिस ठाण्यातील निरीक्षकांबाबत केलेल्या आरोपांचा तपास करावा आणि संबंधित मुलाचा जबाब नोंदवावा, असे आदेश खंडपीठाने दिले. तसेच आरोपी मुलाला तातडीने शिवडीमधील बालसुधारगृहात हलवण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले.
...
असा होता घटनाक्रम
- मागील वर्षी आॅगस्टमध्ये पोलिसांनी आरोपीला हत्येच्या एका प्रकरणात अटक केले होते. त्या वेळी तो सोळा वर्षे दोन महिन्यांचा होता. त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते.
- अचानक दोन तीन दिवसांनी तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या वडिलांना आरोपीचे जन्मदाखला आणायला सांगितले. गुन्हा रद्द करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागितली.
- वडिलांनी पैसे देण्यासाठी नकार दिल्यावर त्यांनी आयोगापुढे आरोपीच्या वयाची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी अर्ज केला. नागपाडा येथील रुग्णालयात ही चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये मुलाचे वय २०-२१ आहे, असा अहवाल देण्यात आला.
- वैद्यकीय चाचणी अहवालावरून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुलाचा ताबा पोलिसांना दिला.
- पोलिसांनी आरोपीची खरी कागदपत्रे आणि आधार कार्ड आयोगाला दाखवली नाही आणि त्यांची दिशाभूल केली असा आरोप वडिलांनी याचिकेत केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08720 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..