शहरात कोरोनाचे १९३ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात कोरोनाचे १९३ नवे रुग्ण
शहरात कोरोनाचे १९३ नवे रुग्ण

शहरात कोरोनाचे १९३ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईत कोरोनाचा चढ-उतार सुरू असून मंगळवारी दिवसभरात १९३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४८ हजार २९९ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली. दिवसभरात २८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या १ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात ७३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. १,०७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,५८,१७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१०% एवढे झाले आहे. राज्यात आज ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२% एवढा आहे. राज्यात आज एकूण ५,५१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08732 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..