कारवाईच्या भीतीने स्टुडीओ हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाईच्या भीतीने स्टुडीओ हटवले
कारवाईच्या भीतीने स्टुडीओ हटवले

कारवाईच्या भीतीने स्टुडीओ हटवले

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मढ-मार्वेत स्टुडिओ उभारलेल्या चार जणांकडे सीआरझेडची परवानगी नसल्याने पालिकेकडून त्यांना नोटीस जारी केली होती; मात्र कारवाईच्या भीतीने चारपैकी तीन जणांनी स्टुडिओ हटविले असून एका स्टुडिओचे प्रकरण न्यायालयात असल्याने तूर्तास त्याला दिलासा मिळाला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकदा मढ-मार्वेच्या एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवला आहे; मात्र याची चौकशीला वेग मिळत नसल्याने किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन यासंदर्भात तपासाला गती देण्याची मागणी केली.
त्यानंतर या पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली. त्या जागी नव्याने किरण दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर दिघावकर यांनी तातडीने सीआरझेडची परवानगी सादर करण्यासाठी चारही स्टुडिओंना नोटीस बजावली. याचदरम्यान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच यासाठी महापालिका उपायुक्त आयुक्त हर्षद काळे नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना ४ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले. त्यामुळे कारवाई अटळ असल्याने यातील भाटियाने स्टुडिओ रिकामा केला. त्यानंतर मिलेनियर आणि एक्सप्रेशन यांनीदेखील हे स्टुडिओ रिकामे करत स्टुडिओ हटविले. मात्र बालाजी स्टुडिओचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई होणार आहे.
...

२०२१ पर्यंत तात्पुरत्या स्टुडिओंसाठी सीआरझेडची परवानगी घेण्यात आलेली होती; मात्र त्यानंतर या चारही स्टुडिओंनी सीआरझेडच्या परवानग्यांचे नूतानीकरण केलेले नव्हते. त्यामुळे १० दिवसांत सीआरझेडची परवानगी सादर करण्यासाठी चारही स्टुडिओंनी नोटीस बजावली. यातील तीन जणांनी स्टुडिओ हटविले आहेत. बालाजी स्टुडिओचा विषय न्यायालयात असल्याने त्याबाबत न्यायालय देईल. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08737 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..