मुंबईत कचरा संकलन, वाहतूक, निविदेत घोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कचरा संकलन, वाहतूक, निविदेत घोळ
मुंबईत कचरा संकलन, वाहतूक, निविदेत घोळ

मुंबईत कचरा संकलन, वाहतूक, निविदेत घोळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : नागपूर महापालिकेने कचरा प्रक्रिया, विल्हेवाट आणि संकलनासाठी निवडलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्याची कचऱ्याचे वजन वाढवण्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. त्यांचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशही दिले आहेत. हेच दोन्ही ठेकेदार मुंबई पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत आहेत. विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी मिलीभगत करून वाढीव किमतीत करार केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला. त्यांनी याबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेने सी आणि डी विभाग कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढली होती, परंतु पालिकेने निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करून कंत्राटदारांना फायदा मिळवून दिला आहे. त्यांना दिलेला निविदा दर १५०० रुपये प्रतिमेट्रिक टन आहे, जो प्रचलित दराच्या जवळपास तिप्पट आहे. नागपूर महापालिकेत बांधा, वापरा, हस्तांतरित अंतर्गत निविदेमध्येही असेच काम केले असून; कचरा संकलन, विल्हेवाट, कचरा पुनर्वापरासाठी ४१४ रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे एक हजार कोटींहून अधिक नुकसान होण्याची भीती मिश्रा यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

सध्याच्या निविदा प्रक्रियेनुसार रिसायकलिंग प्लांट उभारण्यासाठी कंत्राटदारांना त्यांच्या पसंतीच्या जमिनीचा वापर करण्यास विशेषाधिकार प्रदान करण्यात आले आहेत, परंतु सध्याच्या रिसायकलिंग प्लांटमुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मुंबई पालिकेने ही निविदा रद्द करावी. घनकचरा विभागाचे कंत्राटदार व अधिकारी अनेक कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर अटींचा भंग करून लूट करत आहेत. त्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी मिश्रा यांनी आयुक्तांकडे केली आहे.

अंदाजामध्ये मोठी तफावत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२०-२०२१ च्या अंदाजानुसार पालिका क्षेत्रात दरवर्षी सुमारे ३५ लाख मेट्रिक टन कचरा निर्माण होतो; तर सल्लागाराने दररोज १२०० टन कचरा संकलन आणि विल्हेवाटीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सल्लागाराने नवीन निविदेनुसार प्रस्तावित ६०० मेट्रिक टन दैनंदिन क्षमतेच्या दोन पुनर्वापर संयंत्रांची शिफारस केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंदाज आणि सल्लागाराच्या अंदाजामध्ये खूप तफावत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08760 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..