‘अनाथ’मध्ये कोणताही सामाजिक डाग नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अनाथ’मध्ये कोणताही सामाजिक डाग नाही!
‘अनाथ’मध्ये कोणताही सामाजिक डाग नाही!

‘अनाथ’मध्ये कोणताही सामाजिक डाग नाही!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : ‘अनाथ’ शब्दातून सामाजिक रीतीने डाग प्रतीत होतो. यामध्ये स्वावलंबनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे तो बदलून ‘स्वनाथ’ करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे. ‘अनाथ’ शब्दामध्ये कोणताही सामाजिक डाग नाही. हा शब्द बदलण्याचीही गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला. ‘स्वनाथ फाऊंडेशन’च्या वतीने उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.

‘जी मुले आपल्या आई-वडिलांशिवाय राहतात, ते आधीच मानसिक तणावाखाली असतात. त्यात ‘अनाथ’ शब्द त्यांना हतबल, गरजू, नाकारलेला अशा मानसिकतेत आणतो. त्यामुळे तो बदलून ‘स्वनाथ’ हा स्वयंपूर्ततेची जाणीव निर्माण करणारा शब्द प्रचलित करावा,’ असे याचिकादारांचे म्हणणे होते. ‘अनाथ’पेक्षा अधिक बरा शब्द वापरात यावा, असे याचिकादारांच्या वतीने ॲड. उदय वारुंजीकर यांनी सांगितले. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेत उपस्थित मुद्दे अमान्य केले. तसेच यावर हस्तक्षेप करण्यासही नकार दिला. कधी कधी न्यायालयालादेखील स्वतःपुरती लक्ष्मणरेषा आखून घ्यावी लागते, असे स्पष्ट करत खंडपीठाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

भाषेची माहिती किती?
‘अनाथ’ शब्द अनेक वर्षांपासून वापरात आहे. इंग्रजीमधील ‘और्फन’ हा शब्द जसा आहे तसा मराठी, हिंदी, बंगालीमध्ये पूर्वापार हा शब्द वापरला जातो. यामध्ये कोणता सामाजिक डाग आहे, याचिकादाराला वाटले म्हणून शब्द बदलायला हवा, त्यांना भाषेची किती माहिती आहे, असे म्हणत खंडपीठाने यामध्ये बदल करण्यास नकार दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08778 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..