बेस्टचे डिजिटल ऍप वापरा, प्रवास खर्च ५० टक्के कमी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टचे डिजिटल ऍप वापरा, प्रवास खर्च ५० टक्के कमी करा
बेस्टचे डिजिटल ऍप वापरा, प्रवास खर्च ५० टक्के कमी करा

बेस्टचे डिजिटल ऍप वापरा, प्रवास खर्च ५० टक्के कमी करा

sakal_logo
By

बेस्टच्या डिजिटल ॲपमुळे अर्ध्या किमतीत प्रवास
मुंबई, ता. १५ : बेस्टच्या चलो मोबाईल अॅप, स्मार्ट कार्ड आणि एनसीएमसी कार्डचा वापर करून आपला प्रवास खर्च ५० टक्क्यांनी कमी करता येणार आहे. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता बसफेऱ्यांच्या संख्येनुसार पास वितरण सेवा सुरू केली आहे. बस पासचे दर प्रवासाच्या अंतरानुसार ठरवण्यात येत असल्याने प्रवासी निश्चित कालावधीत आपल्या फेऱ्या पूर्ण करू शकतील. अशा प्रकारे फेऱ्यांवर आधारित बस पासमुळे प्रवाशांचा खर्च ५० टक्के कमी होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरत असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

अशा प्रकारच्या बस पासचे अनेक फायदे आहेत. पाच किलोमीटरपर्यंतच्या दैनंदिन परतीच्या प्रवासासाठी १० रुपये तिकीट दर आहे. १०० फेऱ्यांसाठी २८ दिवसांसाठीच्या बसपासचा दर २४९ रुपये आहे. त्याचा प्रतिफेरी दर रु. २.५० इतका होतो. म्हणजेच प्रत्येकी दोन फेऱ्यांकरिता पाच रुपये लागत असल्याने बेस्टच्या दैनंदिन प्रवासभाड्यात ५० टक्के बचत होते.

१० किलोमीटरपर्यंतच्या दैनंदिन प्रवासासाठी २० रुपये तिकीट दर आहे. १०० फेऱ्यांसाठी २८ दिवसांसाठीच्या बसपासचा दर ४९९ रुपये असल्याने त्याचा प्रतिफेरी दर ४.९९ रुपये होतो. अशा प्रकारे प्रत्येकी दोन फेऱ्यांकरिता १० रुपये लागत आहेत. अशाच प्रकारे पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या १०० वातानुकूलित बसफेऱ्यांसाठी २८ दिवसांकरिता रुपये २.९९ प्रतिफेरीप्रमाणे तिकीट दर २९९ रुपये होतो. १० किलोमीटर अंतरापर्यंतच्या १०० बसफेऱ्यांकरिता ६.४९ रुपये प्रतिफेरीप्रमाणे ६४९ रुपये सुपरसेव्हर बसपास योजेनुसार आकारले जातात.

बेस्ट उपक्रमाच्या संपूर्ण क्षेत्रात प्रवास करू इच्छिणारे प्रवासी मुंबई उपनगर, मिरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई प्रवासासाठी दैनंदिन बसपास ५० रुपये (विना वातानुकूलित बस) आणि ६० रुपये (वातानुकूलित बस) यापैकी कोणताही पर्याय निवडू शकतात. कोणत्याही अडथळ्याविना फायदेशीर प्रवासासाठी बेस्ट मोबाईल अॅप बसपासचा वापर करावा. ५० टक्के प्रवास खर्च वाचवावा.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08787 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..