गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज
गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज

गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी समीर, पंकज भुजबळ यांच्यासह अन्य तिघांनी विशेष न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. यावर न्यायालयाने ७ ऑक्टोबरला सुनावणी निश्चित केली आहे. मनी लाँण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेले ओमकार ग्रुपचे संचालक बाबुलाल वर्मा तसेच अध्यक्ष कमल गुप्ता यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याचा आधार घेऊन महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज समीर आणि पंकज यांच्यासह अन्य तिघांनी विशेष न्यायालयात केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08795 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..