पालिकेत १२०० कोटीचा रस्तादुरुस्ती घोटाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेत १२०० कोटीचा रस्तादुरुस्ती घोटाळा
पालिकेत १२०० कोटीचा रस्तादुरुस्ती घोटाळा

पालिकेत १२०० कोटीचा रस्तादुरुस्ती घोटाळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करताना झालेला खर्च वसूल करण्यासाठी मुंबई पालिकेतील प्रशासकाला हाताशी धरून १२०० कोटींचा रस्ता दुरुस्ती घोटाळा सुरू असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबई काँग्रेसतर्फे पत्र देण्यात आले आहे. येत्या सात दिवसांमध्ये या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाच्या अखत्यारितील ‘सीसीआय’मध्ये तक्रार करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.

मुंबई पालिकेत प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता निविदा काढण्यात आल्या; परंतु प्रशासक इकबालसिंह चहल यांनी १२०० कोटींची निविदा काढली व त्यासाठी १०० ते ८०० कोटी एकीकरण ॲडव्हान्स म्हणून कंत्राटदाराला देण्याचे जाहीर केले. मुळात प्रशासकाला एवढी मोठी निविदा काढण्याचा अधिकारच नसतो. हा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला जातो. तसेच एकीकरण देणे पालिकेच्या कायद्यात बसत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदा व नियमबाह्य पद्धतीने केलेली असून, हा एक मोठा रस्ता दुरुस्ती निविदा घोटाळा असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. पालिकेत प्रशासकाची नेमणूक करून पाच ते सहा महिने झाले आहेत; परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकाच महिन्यात पालिकेत रस्ते दुरुस्ती घोटाळा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना हाताशी धरून करण्यात आला. हा घोटाळा कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली केला आहे का, याची सखोल न्यायालयीन चौकशीही झाली पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

‘फॉक्सकॉन’ गुजरातला पळवला!
‘वेदांता-फॉक्सकॉन’ हा महाराष्ट्रात येणारा दीड लाख कोटींचा प्रकल्प एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गुजरातला पळवला. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रद्रोही आहे. या प्रकल्पामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी व गुजरातच्या निवडणुका समोर ठेऊन महाराष्ट्रात येणारा हा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला पळवला. त्याचा आम्ही निषेध करतो, असेही जगताप म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08796 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..