अखेर शवविच्छेदन झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर शवविच्छेदन झाले
अखेर शवविच्छेदन झाले

अखेर शवविच्छेदन झाले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : नंदूरबार प्रकरणातील आदिवासी महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात आले. मध्यरात्रीनंतर २.३० वाजता मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तिचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल धडगाव पोलिस तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.
नंदूरबार बलात्कार-हत्या प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा झाला. धडगावात १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद आढळून आला. त्याच वेळी तिच्या वडिलांनी मुलीवर बलात्कार करून हत्या केली असल्याचा आरोप केला. पोलिसांनी मात्र आत्महत्येची नोंद केली. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला. मात्र प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये गाजल्याने बलात्कार करून हत्या झाल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला. दरम्यान, मुंबईतील रुग्णालयात शवविच्छेदन झाले पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे तिचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला. मात्र काही कागदपत्रीय सोपस्कार राहिल्याने तिचे शवविच्छेदन करण्याचे राहिले. तशी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गुरुवारी शवविच्छेदन करण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08815 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..