तळोज्यातील प्रदूषणाचा बंदीवानांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातील प्रदूषणाचा बंदीवानांना फटका
तळोज्यातील प्रदूषणाचा बंदीवानांना फटका

तळोज्यातील प्रदूषणाचा बंदीवानांना फटका

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : तळोजा येथील वाढत्या प्रदूषणाचा फटका तळोजा कारागृहालादेखील बसला असून तेथील बंदिवानांनी आता मच्छरांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छरदाणी मिळण्याची मागणी केली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे आणि सागर गोरखे यांनी विशेष न्यायालयात याचिका केली आहे. यापूर्वी तेलतुंबडे यांनी न्यायालयात याबाबत याचिका केली होती; मात्र त्या वेळी न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आणि कारागृह प्रशासनाला सर्वत्र स्वच्छता करण्याचे निर्देश दिले होते. तसेच मछर हटवण्यासाठी वापरण्यात येणारी मलम आणि अगरबत्त्यादेखील आता उपयोगी होत नाहीत, एवढा मच्छरांचा वावर वाढला आहे असे सांगण्यात आले आहे. हे सर्व पर्याय वापरूनदेखील मच्छरांचा त्रास होत असून यामुळे मलेरिया किंवा डेंगी होण्याची शक्यता आहे, अशी भती त्यांनी व्यक्त केली आहे.
खारघर परिसरात मलेरियाची साथ निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी अशा साथी असतात, तिथे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंदींना मच्छरदाणी पुरवण्यात येते. केरळ, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये हा नियम लागू आहे असेही त्यांनी सांगितले; मात्र कारागृह प्रशासनाने याला विरोध केला आहे. मच्छरदाणी दिली तर त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
...
आरोपी रुग्णालयात
कारागृहात असलेल्या अस्वच्छतेमुळे मच्छरांची पैदास होत आहे, त्यामुळे त्यावर तातडीने उपाय करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी वर्णन गोन्साल्विज यांना मध्यंतरी डेंगीची बाधा झाली होती. सध्या ते जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08821 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..