अखंडित पुरवठ्यासाठी महावितरची वीजखरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखंडित पुरवठ्यासाठी महावितरची वीजखरेदी
अखंडित पुरवठ्यासाठी महावितरची वीजखरेदी

अखंडित पुरवठ्यासाठी महावितरची वीजखरेदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने वीज खरेदीसाठी निविदा मागवल्या होत्या. यामध्ये अवाडा एनर्जी कंपनी ३०० मेगावॉट क्षमतेसाठी प्रतिकेडब्ल्यूएच २.८३ रुपये हा दर मिळवून निविदा प्रक्रियेत बाजी मारली आहे.
महावितरणने यापूर्वी ऑगस्टमध्ये ५०० मेगावॉट ग्रिड कनेक्टेड सौरप्रकल्पांमधून वीज खरेदी करण्यासाठी एक लिलाव आयोजित केला होता. यामध्येही अवाडा एनर्जीने प्रति किलोवॅट २.९१ रुपये दराने २५ मेगावॉट क्षमतेच्या निविदेत बाजी मारली होती. यानंतर महावितरणने मागवलेल्या निविदेतही अवाडा एनर्जीने बाजी मारली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या वीजखरेदी करारावर स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून १८ महिन्यांचा कार्यान्वित कालावधी आहे आणि १२ महिन्यांत त्यांनी आर्थिक व्यवहार पूर्तता साध्य करणे आवश्यक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08824 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..