म्हाडा सोडतीत पुन्हा प्रतीक्षा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा सोडतीत पुन्हा प्रतीक्षा यादी
म्हाडा सोडतीत पुन्हा प्रतीक्षा यादी

म्हाडा सोडतीत पुन्हा प्रतीक्षा यादी

sakal_logo
By

तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडा सोडतीमधील प्रतीक्षा यादीमुळे भ्रष्टाचार होत असल्याने तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या सोडतीमधील प्रतीक्षा यादी बंद करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र राज्यात सत्तांतर होताच मागील सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यानुसार म्हाडा सोडतीमधील बंद करण्यात आलेली प्रतीक्षा यादी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या प्रतीक्षा यादीचा कालावधी निश्चित करण्यात येणार असून ती केवळ एक वर्षापर्यंत वैध राहणार आहे.
म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत घरांच्या उपलब्धतेनुसार सोडत काढण्यात येते. या सोडतीमध्ये विजयी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येत असे. सोडतीमध्ये यशस्वी ठरलेला अर्जदार कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास किंवा काही कारणाने घर परत केल्यास त्याच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील अर्जदाराला संधी देण्यात येत होती. सोडतीनंतर प्रतीक्षा यादीतील अर्जदाराला दलालांकडून विविध प्रलोभने दाखवण्यात येतात. असे प्रकार रोखण्यासाठी गृहनिर्माण विभागाने सोडतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे प्रतीक्षा यादीच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. तसेच आगामी सोडतीसाठी अर्जदारांकडून थेट मूळ कागदपत्रे घेण्यात येणार असून पात्र अर्जदारांचाच सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
...
दिवाळीत सोडत
प्रतीक्षा यादीमुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी गृहनिर्माण विभागाने ही यादीच सोडतीमधून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी औरंगाबाद मंडळाच्या सोडतीपासून सुरू झाली आहे. दिवाळीत म्हाडाची महत्त्वाची मंडळे असलेल्या मुंबई आणि कोकण मंडळामार्फत सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीची तयारी मंडळाने सुरू केली असून सोडतीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
...
म्हाडा सोडतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार पात्र अर्जदारांचीच सोडत काढण्यात येणार आहे. मात्र पात्र ठरल्यानंतरही एखाद्या अर्जदाराने घर परत केल्यास अशी घरे पडून राहतील. त्यामुळे सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रतीक्षा यादीचा कालावधी एक वर्षापर्यंत ठेवण्यात येणार आहे. वर्षानंतर ही यादी रद्द होईल.
- अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा
...
निर्णयात बदल करावा लागणार!
म्हाडा सोडतीमधील प्रतीक्षा यादी रद्द करण्याबाबत गृहनिर्माण विभागाने शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीचा समावेश करण्यासाठी शासन निर्णय रद्द करावा लागणार आहे. शासन निर्णय रद्द झाल्यास पुन्हा सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीचा समावेश करण्यात येईल, असे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08843 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..