अकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीची तिसरी 
विशेष फेरी आजपासून
अकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून

अकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : मुंबई महानगरसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांतील अकरावीच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून उद्यापासून (ता. १९) तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ही फेरी शेवटची असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, शिवाय पहिल्या विशेष फेरीपर्यंत प्रवेश पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लवकरच वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
१९ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीत भाग-१ मध्ये आपला अर्ज भरता येईल, तर २० सप्टेंबर रोजी भाग एक संपादित करून तो प्रमाणित करून २१ सप्टेंबरपासून भाग-२ साठी अर्ज भरू शकतात. त्याचवेळी विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम ठरवता येतील. दोन्ही भाग भरल्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर निवड यादी प्रदर्शित केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार मिळालेले महाविद्यालयही दर्शविले जातील. त्यासोबतच कट ऑफ फेरी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.
तिसऱ्या विशेष फेरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना २३ सप्टेंबरपासून संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करता येतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा आहे, ती प्रक्रिया २४ सप्टेंबरपर्यंत करता येईल आणि २५ सप्टेंबरला रिक्त राहिलेल्या जागांची माहिती आणि प्रवेश फेरीची अखेरची स्थिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08845 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..