गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच कृती आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच कृती आराखडा
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच कृती आराखडा

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच कृती आराखडा

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधला. आझाद मैदानात त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले. गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही दिली. या वेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
...
सुशोभीकरणासाठी जे.जे.ची मदत
राज्यातील प्रमुख गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांच्या सुशोभीकरणासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाची मदत घेता येईल काय, यासाठीची चाचपणी करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन या संदर्भातील माहिती घेतली.
ड्रॉइंग काढणे, डॉक्युमेंटेशन तयार करणे, तसेच नकाशे तयार करणे, चित्रीकरण करणे, जुन्या वास्तूंचे संवर्धन करणे, त्यांचे जतन करणे आणि पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयी तसेच त्या संदर्भातील कार्यक्रम तयार केला जाऊ शकतो, असे मिश्रा यांनी सांगितले.
...
दोन किल्ल्यांच्या प्रस्तावांना मान्यता
राज्यात सुमारे ३५० गड-किल्ले आहेत. त्यापैकी ४० भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण; तर ६१ गडकिल्ले हे राज्य पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतात. त्यापैकी सुधागड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरण आदी विकासाचा प्रस्ताव असून त्यात दोन किल्ल्यांच्या प्रस्तावांना मान्यताही मिळालेली आहे. त्यामध्ये सुधागड, राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे; तर विजयदुर्ग, शिवनेरी या किल्ल्यांचाही विकास केला जाणार आहे; तर उदगीर आणि औसा येथील किल्ल्यांच्या विकासासंदर्भात मान्यता मिळाली असून त्यासंदर्भातील कामकाज पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार असल्याचे विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08853 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..