अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन
अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन

अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : उद्योगपती मुकेश अंबानी यांना दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या विष्णू भौमिक (वय ५६) याला सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
भौमिक मानसिक रीतीने आजारी असून अनेकदा त्याला स्वतःचे भान राहत नाही. त्यामुळे भावनिक दृष्टीने तो कधी कधी अतिउत्साही; तर कधी निराशेच्या गर्तेत असतो, असा युक्तिवाद त्याचे वकील सुभाष झा यांनी केला. यासंबंधी त्याचे वैद्यकीय अहवालदेखील न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला. तसेच यापुढे अशी कृती न करण्याची ताकीदही दिली आहे. भौमिकने यापूर्वीदेखील असे फोन केले आहेत. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात तीन वेळा फोन करून त्याने ही धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या वतीने जामिनाला विरोध करण्यात आला. मागील दीड महिन्यापासून तो कारागृहात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08862 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..