डॉ. हैनी बाबू यांना यांचा जामीन अर्ज नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. हैनी बाबू यांना यांचा जामीन अर्ज नामंजूर
डॉ. हैनी बाबू यांना यांचा जामीन अर्ज नामंजूर

डॉ. हैनी बाबू यांना यांचा जामीन अर्ज नामंजूर

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी डॉ. हैनी बाबू यांना मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. बाबू यांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी नामंजूर केला.
बाबू यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. बंदी घातलेल्या माओवादी संघटनांच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर एनआयएने ठेवला आहे. एनआयएच्या वतीने जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. आरोपी कारवायांमध्ये सहभागी होता आणि देशाच्या सार्वभौमत्वाविरोधात त्यांनी लढा पुकारला होता. अशा कारवाया दहशतवादासारख्याच असतात, असे एनआयएने युक्तिवादात मांडले होते. बाबू यांच्यावर नक्षलवादी कारवायांना पाठबळावर दिल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच सरकारविरोधात कारवाया करणे, असादेखील आरोप केला आहे. प्रा. बाबू दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असून त्यांना मागील वर्षी अटक करण्यात आली आहे. न्या. नितीन जामदार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने यावरील सुनावणी पूर्ण केली होती. खंडपीठाने आज यावर निकालपत्र जाहीर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08868 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..