ST News : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित द्या

ST News : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित द्या

मुंबई : जुलै २०१९ पासून एसटीतून निवृत्त झालेल्या ८५०० कर्मचारी व अधिकाऱ्यांना रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे अद्याप महामंडळाकडून मिळालेले नाहीत. आजअखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २१५ कोटी रुपये इतके देणे थकीत आहेत. याची राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेत, थकीत रक्कम त्वरित द्यावी, असे आदेश एसटी प्रशासनाला दिले.
महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत असल्याने अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत. रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे दररोज सुमारे ५० लाख इतकी रक्कम निवृत कर्मचाऱ्यांना दिली जाते.

हे प्रमाण अत्यल्प असून त्यामुळे निवृत कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. महामंडळ आर्थिक अडचणीत आहे, हे खरे असले, तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत, त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठीसुद्धा एक वेळचा पर्याय म्हणून २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसने शासनाकडे केली होती; मात्र संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या ८५०० निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे हक्काचे पैसे महामंडळाकडून थकवण्यात आले आहेत.

११० कामगारांचा मृत्यू
गेल्या चार वर्षांत थकीत देणी मिळण्याअगोदर ११० पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08879 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..