शासकीय कामासाठीच चार्टर्ड विमानाचा वापर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कामासाठीच
चार्टर्ड विमानाचा वापर!
शासकीय कामासाठीच चार्टर्ड विमानाचा वापर!

शासकीय कामासाठीच चार्टर्ड विमानाचा वापर!

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने मी शासकीय कामासाठीच चार्टर्ड विमानाचा वापर केला. विमानाचा वापर कोणत्याही खासगी कामासाठी केला नाही, असा खुलासा माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.
लॉकडाऊन सुरू असताना राऊत यांनी खासगी कामासाठी चार्टर्ड विमान वापरून वीज कंपन्यांकडून ४० लाख रुपये खर्च केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली. राऊत यांनी १२ वेळा प्रवास केला, असे याचिकेत म्हटले आहे. यावर राऊत यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा केला आहे. कोरोना काळात मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यामुळे शासकीय कामांसाठी मुंबईहून मला वारंवार नागपूरला जावे लागत होते. एरवी रेल्वे किंवा सार्वजनिक विमानाने मी प्रवास करतो; मात्र लॉकडाऊन असल्यामुळे चार्टर्ड विमान वापरल्याचे राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले. याचिकेवर पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होणार आहे. भाजपचे माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी ही याचिका केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08882 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..