अरमान कोहलीला सशर्त जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरमान कोहलीला सशर्त जामीन मंजूर
अरमान कोहलीला सशर्त जामीन मंजूर

अरमान कोहलीला सशर्त जामीन मंजूर

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : मागील एक वर्षापासून कारागृहात असलेला बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला अखेर मंगळवारी (ता. २०) मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
सुमारे १.२ ग्रॅम कोकेन सापडल्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थविरोधी पथकाने त्याला मागील वर्षी आॅगस्टमध्ये अटक केली होती. न्या. नितीन सांब्रे यांनी त्याला एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, पुन्हा अशा कारवाया न करणे अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. तसेच अटींचे उल्लंघन केले, तर जामीन रद्द केला जाईल, अशी ताकीदही न्यायालयाने दिली आहे. याबाबत सविस्तर निकालपत्र न्यायालय लवकरच देणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08884 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..