दीडशे विकसकांनी थकवले भाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीडशे विकसकांनी थकवले भाडे
दीडशे विकसकांनी थकवले भाडे

दीडशे विकसकांनी थकवले भाडे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : शहर आणि उपनगरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हाती घेतलेल्या तब्बल १५० विकसकांनी झोपडीधारकांचे पर्यायी वास्तव्याचे भाडे थकवले आहे. या विकसकांनी एक महिन्यात झोपडीधारकांचे भाडे न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिला आहे. एक महिन्यात विकसकांनी भाडे न दिल्यास विकसकांच्या विक्री घटकाच्या बांधकामाला स्थगिती देण्यात येणार आहे.
एसआरएमार्फत मुंबईतील झोपडीधारकांना पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहे. या योजनेनुसार विकसकांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. इमारतीचे बांधकाम करतेवेळी योजनेतील पात्र झोपडीधारकांना विकसकाकडून झोपडीचे निष्कासन केल्यावर भाडे देणे बंधनकारक आहे, परंतु विकसक झोपडपट्टीधारकांना मुदतीत भाडे देत नसल्याने अनेक झोपडीधारक, संस्था एसआरए कार्यालयात दाद मागण्यासाठी येतात. विकसकांकडून भाडे मिळत नसल्याने गोरगरीब झोपडीधारकांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
...
संकेतस्थळावर यादी
एसआरए प्राधिकरणाने चालू योजनांचा आढावा घेतला असता सुमारे १५० विकसकांनी झोपडीधारकांचे भाडे थकवल्याचे निदर्शनास आले आहे. या विकसकांची यादी एसआरएने संकेतस्थळावर टाकली आहे. या यादीमध्ये नामांकित विकसकांचा समावेश आहे. या विकसकांना रहिवाशांचे थकीत भाडे एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. एक महिन्यात झोपडपट्टीधारकांचे भाडे देऊन त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र प्राधिकरणाला सादर करावे, अन्यथा विकसकांना थकबाकीदार म्हणून जाहीर करण्यात येणार आहे असे म्हटले आहे.
...
- विकसकांना थकबाकीदार घोषित करण्यात येणार.
- विकसकांच्या विक्री इमारतीच्या बांधकामांना स्थगिती देण्यात येईल.
- विकसकांना कोणतीही नवीन योजना करता येणार नाही.
- विकसकांना थकबाकीदार घोषित करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08887 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..