कोरोनाचे दिवसभरात १२० नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे दिवसभरात १२० नवीन रुग्ण
कोरोनाचे दिवसभरात १२० नवीन रुग्ण

कोरोनाचे दिवसभरात १२० नवीन रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : मुंबईत मंगळवारी दिवसभरात १२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४९ हजार २३५ वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७२६ वर पोहोचली आहे.
दिवसभरात १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख २८ हजार ५७३ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ९३६ सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात ५५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,६३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४५,६९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,१६,३८४ (०९.६० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,२१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08893 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..