लालबागचा राजा मंडळाला साडेतीन लाखाचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालबागचा राजा मंडळाला साडेतीन लाखाचा दंड
लालबागचा राजा मंडळाला साडेतीन लाखाचा दंड

लालबागचा राजा मंडळाला साडेतीन लाखाचा दंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सवादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ तसेच रस्तावर खड्डे खोदल्याने पालिकेच्या ई विभागाने मंडळाला तीन लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांनी दिली.
यंदा शिंदे सरकारकडून निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी नियमांत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त (परिमंडळ- २) तसेच गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी सूचना दिल्या होत्या. तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या मंडळांवर दरवर्षीप्रमाणे कारवाईदेखील करणार असल्याचे त्यांनी गणेशोत्सवापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पदपथ तसेच रस्त्यावर लालबागचा राजा गणेश मंडळाकडून १८३ खड्डे खोदण्यात आले. त्यापैकी पदपथावर ५३; तर रस्त्यावर १५० खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंड लावण्यात आला असल्याचे बिरादार यांनी सांगितले. लालबागचा राजा गणेश मंडळाला यापूर्वीदेखील असा दंड झालेला आहे आणि तो मंडळाकडून भरण्यातदेखील आला आहे. यंदादेखील १८३ खड्डे झाल्याने प्रत्येक खड्ड्यासाठी दिवसाला दोन हजार रुपये असा दंड लावण्यात आला आहे, अशी माहिती ई विभागातील सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08897 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..