निर्मात्याच्या पत्नी-मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्मात्याच्या पत्नी-मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा!
निर्मात्याच्या पत्नी-मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा!

निर्मात्याच्या पत्नी-मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : पाकिस्तानमध्ये अडकलेल्या निर्मात्याच्या पत्नी आणि मुलांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत आणि केवळ अर्धवट आश्वासने देऊ नये, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावले.
निर्माता मुश्ताक नाडियादवाला यांनी पाकिस्तानी नागरिक मरियम चौधरी यांच्याबरोबर सन २०१२ मध्ये विवाह केला आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्जही केला होता. सन २०२० मध्ये त्या पाकिस्तानमध्ये आपल्या आजारी आई-वडिलांना भेटायला मुलांसह पाकिस्तानमध्ये गेल्या. मात्र २०२१ मध्ये त्यांनी लाहोर कोर्टात एकल पालकत्व मिळण्यासाठी अर्ज केला. पाकिस्तानी आई-वडिलांचे ऐकून तिने हा निर्णय घेतला आहे; मात्र मला माझ्या मुलांचा आणि पत्नीचाही ताबा हवा आहे, अशी हेबियस कॉर्प्सची याचिका केली आहे. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.
परराष्ट्र मंत्रालयाने याचिकादाराची नुकतीच भेट घेतली आणि यावर माहिती घेतली; पण मुले पाकिस्तानमध्ये असण्याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्यामुळे आम्ही पाकिस्तान सरकारच्या सहकार्याशिवाय काही करू शकत नाही, अशी कबुली अधिकाऱ्याच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. इस्लामाबादमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाबरोबर आम्ही संपर्क साधला आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. मात्र खंडपीठाने यावर असमाधान व्यक्त केले.
...
वरवर माहिती देऊ नका!
आम्ही या तपशिलावर समाधानी नाही; मग याचिकादार कसे समाधानी असतील, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. आम्हाला अर्धवट आश्वासन आणि वरवर माहिती देऊ नका. मुलांना हुडकण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते करा, असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08899 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..