केईएम रुग्णालयाबाहेर मृतदेह १० तास पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएम रुग्णालयाबाहेर मृतदेह १० तास पडून
केईएम रुग्णालयाबाहेर मृतदेह १० तास पडून

केईएम रुग्णालयाबाहेर मृतदेह १० तास पडून

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पालिकेच्या केईएम रुग्णालयाबाहेरील पदपथावर एका इसमाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला; मात्र त्याचा मृतदेह तब्बल दहा तास पदपथावर पडून होता. अखेर पोलिसांनी त्याच्या बहिणीचा शोध घेऊन तिला याबाबत कळवले. आपला भाऊ गेल्याची माहिती मिळताच तिने एकच टाहो फोडला.
केईएमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील पदपथावर राहणारा संदेश विचारे नामक इसम गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही बेवारस समजून किमान दहा तास त्याचा मृतदेह पदपथावर पडून होता. संदेश छोट्या-मोठ्या काही वस्तू आणून त्या फूटपाथवर विकत होता. काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेलेला संदेश व्यवसाय सोडून पदपथावर भीक मागून तेथेच झोपत असे. जवळच त्यांची बहीण भारती विचारे राहत होती; पण गेले तीन-चार दिवस तो घरी गेला नसल्याचे भारती यांच्याकडून सांगण्यात आले.
...
बहिणींनी घेतला ताबा
भारती या केईएम रुग्णालयात केअर टेकरचे काम करतात. त्यामुळे बुधवारी सकाळी त्या रुग्णालयात आल्यावर त्यांना भावाच्या मृत्यूची खबर लागली. तोपर्यंत हा मृतदेह बेवारस असल्यासारखा पडून होता. दरम्यान पोलिसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08908 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..