पाचव्या मजल्यावरून अजगराची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचव्या मजल्यावरून अजगराची सुटका
पाचव्या मजल्यावरून अजगराची सुटका

पाचव्या मजल्यावरून अजगराची सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : पवईतील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून एका अजगराची सुटका करण्यात आली. अम्मा केअर फाउंडेशन आणि प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी केली.
प्राणिप्रेमी भूषण साळवे आणि धीरज फोडकर यांनी म्हाडा कॉलनी, रामबाग, पवईजवळ, म्हाडा कॉलनी येथील पाचव्या मजल्यावरील खिडकीतून चार फूट लांबीच्या या अजगराला ताब्यात घेतले. रहिवासी डॉ. विजय बघेल यांनी हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर रेस्क्यू पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने त्याची सुटका केली. प्राथमिक उपचार करून वनविभागाला कळवण्यात आले. वनविभागाने अजगराला ताब्यात घेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडल्याचे मानद वन्यजीव वॉर्डन आणि एसीएफ पीएडब्ल्यूएस-मुंबईचे संस्थापक सुनिश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08921 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..