उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी एनआयएच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी एनआयएच्या ताब्यात
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी एनआयएच्या ताब्यात

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी एनआयएच्या ताब्यात

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : अमरावतीमधील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आज प्रमुख आरोपी शाहीम अहमद एनआयएच्या ताब्यात आला. विशेष न्यायालयात तो शरण येणार होता; पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.
या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खानचा शाहीम वाहनचालक होता. मी घाबरलो म्हणून शरण आलो नाही, असे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्याच्या कारणावरून कोल्हे यांची अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या केली होती. हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. नागपुरात शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये दहा आरोपींचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08923 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..