अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पदवीच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठीची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील.
अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी ७ ऑक्टोबर रोजी संकेतस्थळावर जाहीर होईल. तर पहिली गुणवत्ता यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यंदा प्रवेशाचे दोन ऐवजी तीन कॅप फेरी होणार असल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत उरकली जाणार असून त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकीचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या संस्थांमधील १ लाखाहून अधिक जागा आहेत. या जागावर प्रवेश एमएचटी सीईटीत असलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. सीईटी सेलने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावर्षी ७९८ स्वीकृती केंद्र (एफसी) केंद्राची निर्मिती केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08925 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..