Mumbai : रिपब्लिक टीव्हीला ईडीकडून क्लिन चिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic tv
रिपब्लिक टीव्हीला ईडीकडून क्लिन चिट

Republic tv : रिपब्लिक टीव्हीला ईडीकडून क्लिन चिट

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात गाजलेल्या टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात ईडीने रिपब्लिक टीव्हीला क्लिन चिट दिली आहे. मात्र न्यूज नेशन आणि इंडिया टीव्हीविरोधात अद्याप तपास सुरू आहे, असेदेखील स्पष्ट केले आहे.

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी कृत्रिम पद्धतीने वाढवून जाहिराती मिळवल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी आणि ईडीने केला आहे. यामध्ये रिपब्लिक टीव्ही, आर भारतसह अन्य काही चॅनेलची चौकशी करण्यात आली होती. ईडीने या प्रकरणात नुकतेच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि महामुव्हीज या चॅनेलचा समावेश आहे. रिपब्लिक टीव्ही, आर भारत आणि त्याचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना ईडीने क्लिन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास आणि आम्ही केलेला तपास यामध्ये भिन्नता असून आरोपात तथ्य नाही, असे ईडीने स्पष्ट केले आहे. सध्या सोळा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल आणि हंसा रिसर्च ग्रुपशी संबंधित काही जणांचा समावेश आहे.

अनैसर्गिक टीआरपी वाढ
टीआरपी गैरव्यवहारात लोकांना पैसे देऊन चॅनेल बघायला लावायचे आणि अनैसर्गिक टीआरपी वाढवायचा, असा हा गैरप्रकार आहे. ईडी यामध्ये आणखी काही चॅनेलची चौकशी करत आहे. कांदिवली पोलिसांनी सन २०२० मध्ये याबाबत पहिल्यांदा गुन्हा दाखल केला आहे. काही एजन्सी अशा प्रकारे बेकायदा टीआरपी वाढवतात आणि जाहिराती व अन्य महसूल जमा करतात, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08936 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..